“त्यावेळी खर्गे आणि शरद पवारांमध्ये वाद झाला अन् साहेब रागाने…” ; अजित पवारच्या पहाटेच्या शपथविधीच्या षडयंत्रावर भुजबळांचे मोठे वक्तव्य

Chhagan Bhujbal । राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी पक्षाच्या अधिवेशनात मोठे वक्तव्य केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २०१९ च्या पहाटेच्या शपथविधी सोहळा हा मोठा षडयंत्राचा भाग होता, असा खळबळजनक दावा धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आता त्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत काही सवाल उपस्थित केले आहेत. ]
धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर बोलताना ‘अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं? हे षडयंत्र राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी रचलं? याची माहिती नाही. मात्र, त्यावेळी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात वाद झाला होता, असं म्हणत तेव्हा नेमकं काय घडलं होतं? याविषयी मोठे विधान केले आहे.
जर षडयंत्र होतं तर ते षडयंत्र कोणी रचलं? Chhagan Bhujbal ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधी हा षडयंत्राचा भाग होता, असं मोठं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले, “धनंजय मुंडे यांचं भाषण झालं तेव्हा मी त्या ठिकाणी नव्हतो. मात्र, मी माध्यमातून थोडसं ऐकलं. धनंजय मुंडेंनी म्हटलं की पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं. जर षडयंत्र होतं तर ते षडयंत्र कोणी रचलं? मग उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत. काँग्रेसचेही नेते षडयंत्र रचू शकत नाही. मग षडयंत्र कोणी रचलं?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
खर्गे आणि पवारांमध्ये वाद झाला आणि साहेब रागाने निघून गेले Chhagan Bhujbal ।
भुजबळ पुढे म्हणाले, “मग हे षडयंत्र राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी रचलं? याची काही माहिती नाही. मात्र, मला एवढं आठवतं की २०१९ मध्ये बैठका सुरु होत्या. त्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेत्यांमध्ये बैठका सुरु होत्या. तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवारांचा थोडा वाद झाला होता, तेव्हा शरद पवार रागाने निघून गेले होते. पण त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरुच होत्या. त्याप्रमाणे ८ वाजता एका ठिकाणी बैठक बोलावली गेली होती. मात्र, त्या बैठकीला अजित पवार हे उपस्थित नव्हते”, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.
“तेव्हा अजित पवार बैठकीला उपस्थित नव्हते तेव्हा आम्हाला वाटलं की ते कुठे काही कामात अडकले असतील. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी टिव्ही लावली आणि लक्षात आलं की अजित पवार यांचा शपधविधी झाला आहे. त्यानंतर मी तातडीने शरद पवारांकडे गेलो, तेव्हा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि सांगितलं होतं की आपण मजबुतीने उभं राहिलं पाहिजे आणि जे काही झालं आहे ते होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी कामाला लागलं पाहिजे असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं”, असे छगन भुजबळांनी म्हटले.





