Chhaava Movie : विक्की कौशल नव्हे, ‘छावा’मध्ये हा सुपरस्टार असता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत

Chhaava : सध्या देशभरात ‘छावा’ चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. छावा चित्रपटाला रिलीज होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लवकरच छावा 500 कोटींची सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ठ होईल.
या चित्रपटाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भरभरून कौतुक केले. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विक्की कौशलचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. संपूर्ण जगभर छावा माहोल तयार झाला असून प्रेक्षकांची पाऊल थिएटर्सकडे वळताना दिसत आहेत.
पण तुम्हाला या सिनेमाबद्दल एक गोष्ट माहित आहे का? ‘छावा’ सिनेमाच्या मुख्य पात्रासाठी म्हणजेच अभिनेता विक्की कौशलच्या जागी साऊथच्या सुपरस्टारला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, या अभिनेत्यानं ही ऑफर नाकारली होती. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे.
निर्मात्यांनी यापूर्वी विकी कौशलच्या भूमिकेसाठी साऊथ सुपरस्टार ‘महेश बाबू’शी संपर्क साधला होता. मात्र, महेश बाबूने या प्रोजेक्टमध्ये रस दाखवला नाही, त्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी विक्की कौशलला कास्ट केले. सध्या हा सिनेमा रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई करत असून, अनेक बड्या चित्रपटांचे रेकार्ड ‘छावा’ने मोडले आहेत.
दरम्यान, लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘छावा’ चित्रपटात विक्की कौशलसोबतच अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.





