Chhaava | Vicky Kaushal | Rashmika Mandanna : 14 फेब्रुवारीला चित्रपटातगृहात रिलीज झालेल्या छावा चित्रपटाची बॅाक्स अॅाफिसवर यशस्वी घोडदौड कायम आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने तब्बल 500 कोटींची कमाई करत या वर्षातील पुष्पानंतर दुसरा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान मिळवला आहे. छावा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून दात देत सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सिनेमा इंडस्ट्रीमधील अनेकांनी छावा चित्रपटाविषयी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 23 दिवस झाले आहेत. तरीही चित्रपटाची कमाई वाढतच आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, चित्रपटाने आतापर्यंत 508.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी रिलिजने 503.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तेलगु डब व्हर्जनने 5.5 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे सिनेमाच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ‘पुष्पा 2 द रुल’ सारख्या मोठ्या सिनेमाचे विक्रम छावा सिनेमाने मोडले आहेत. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ (रु. 244.14 कोटी), राझी (रु. 123.74 कोटी), सॅम बहादूर (93.95 कोटी) आणि जरा हटके जरा बचके (5 कोटी 88 कोटी) यांच्या पुढे ‘छावा’ पोहोचला आहे.