चेतन तुपे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील; संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विठ्ठल विचारेंचा विश्वास

हडपसर – काळेपडळ परिसरातील असणाऱ्या विविध जाती- धर्माच्या धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांचे स्वागत केले. काळेपडळ, ससाणेनगर परिसरात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुपे यांना मिळत आहे. त्यामुळे चेतन तुपे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विठ्ठल विचारे यांनी व्यक्त केला आहे.
हडपसर विधानसभेचे आमदार महायुतीचे चेतन विठ्ठल तुपे यांची जनसंवाद यात्रा हिंगणेमळा, ससाणेनगर, काळेबोराटे नगर या ठिकाणी पार पडली. यावेळी पदयात्रा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विठ्ठल विचारे यांनी काळेबोराटे नगर येथे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादीचे शिवाजी गार्डी, दीपक जगताप, हनुमान सेवा ट्रस्टचे अण्णा भालेकर, प्रताप बापू बोराटे, गजानन महाराज मंदिराचे बापू शेंडकर, विठ्ठल मंदिराचे नरेंद्र चव्हाण, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या जगताप ताई, राधाकृष्ण मंदिराचे जगताप, संत गोरा कुंभार मंदिराचे मोरे, संत नामदेव मंदिराचे राऊत, संत शिरोमणी नरहर महाराज मंदिराचे काका डहाळे, पिटेश्वर महाराज मंदिराचे मुला रामजी, ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे किशोर राऊत, आनंद संप्रदाय ज्ञानयोग सेवा संस्थेचे गायकवाड, दत्त मंदिराचे जाधव, श्री.राम मंदिराचे सुरेश बारवकर, विश्वकर्मा मंदिराचे विश्वस्त, आई माताजी मंदिराचे प्रेमा राम, स्वामी समर्थ मंदिराचे देशमुख, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, काळेबोराटे नगर, ससाणे नगर परिसरात पत्रक वाटून महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांना मतदान करण्याचे आवाहन विठ्ठल विचारे यांच्याकडून केले जात आहे.





