Rajpal Yadav : ‘चेक बाऊन्स’ प्रकरण भोवलं; कोर्टाने फटकारल्यानंतर राजपाल यादवचे आत्मसमर्पण
Rajpal Yadav : राजपाल यादव याला दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणी फटकारल्यानंतर त्याने आत्मसमर्पण केले आहे.

Rajpal Yadav : बॅालीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव हा चेक बाऊन्स प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणी दिल्ली हायकोर्टने २ फेब्रुवारी २०२६ रोजी राजपाल यादवला ४ फेब्रुवारीपर्यंत सरेंडर (आत्मसमर्पण) करण्याचे आदेश दिले होते. पण ही वेळ पाळण्यात आली नाही. यामुळे राजपाल यादवला कोर्टाने खडेबोल सुनावले आहेत.
तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने गुरुवारी आत्मसमर्पण केले. न्यायालयाने म्हटलं होते की, “तुम्ही मुंबईत असल्याचं सांगितलं होतं, म्हणून तुम्हाला आत्मसमर्पण करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली. आता असं दिसतंय की, कोणताही आधार शिल्लक नाही. उदारता दाखवण्याचं कोणतंही कारण नाही…” अशा शब्दांत स्पष्टपणे सांगितले.
या प्रकरणी दिलासा मिळावा म्हणून राजपाल यादव याने याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने कोणताही दिलासा देण्याचा विचार करण्यापूर्वी आत्मसमर्पण करणं आवश्यक आहे, अशा शब्दांत त्याला फटकारले. तसेच दिलासा मागितल्या प्रकरणी महत्वाचे विधान केले. कोर्टाने आत्मसमर्पण केल्यानंतर न्यायालय काही दिलासा देऊ शकतं का? ते तपासलं जाईल. असे स्पष्ट केले.
नेमकं प्रकरण काय?
राजपाल यादवने मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून अंदाजे पाच कोटींचे कर्ज घेतले होते. कंपनीचा दावा आहे की राजपाल यादवने पैसे परत करण्यासाठी अनेक चेक दिले होते, परंतु ते सर्व बाउन्स झाले. यानंतर कंपनीने राजपाल यादवविरुद्ध चेक बाउन्स (Cheque Bounce) झाल्याचा खटला दाखल केला होता.
राजपाल यादवच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. आगामी काळात तो ‘भूत बांगला’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटांमध्ये दिसणार असून, काही चित्रपटांवर काम सुरू असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : Shankar Mandekar : मुळशीच्या विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या! आमदार शंकर मांडेकर यांचे आवाहन






