IPL 2025 Mega Auction : – चेन्नई सुपर किंग्स आगामी लिलावात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनवर बोली लावू शकते, असा विश्वास इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने व्यक्त केला. अँडरसन याने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर प्रथमच आयपीएलसाठी नोंदणी केली.
चेन्नई संघ हा सुरुवातीच्या काही षटकांतमध्ये चेंडू स्विंग करण्याची क्षमता असणाऱ्या गोलंदाजांना प्राधान्य देतो. यामध्ये शार्दूल ठाकूर त्याचे उदाहरण असल्याने अँडरसन चेन्नई संघात दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे वॉन म्हणाला.
जेम्स अँडरसनने 2014 मध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी तो कधीच आयपीएलमध्ये खेळाला नाही. मी आयपीएलचा अनुभव कधीच घेतला नाही. मात्र, अजूनही माझ्याकडे खेळाला काही देण्याची क्षमता असल्याचे अँडरसनने बोलताना सांगितले होते.
दरम्यान, नुकतेच संघाकडून आयपीएल 2025 साठी रिटेन अर्थात कायम ठेवण्याच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने एकूण पाच खेळाडूंवर विश्वास व्यक्त करण्यात आला. यामध्ये चेन्नईकडून कायम ठेवण्यात आलेल्या पाच खेळाडूंमध्ये माजी कर्णधार एमएस धोनी, रुतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.
IPL 2025 Retention : चेन्नई सुपर किंग्सकडून 5 खेळाडू रिटेन, यादी पाहून चाहत्यांना मिळेल दिलासा…
तर चेन्नईनं मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल मिर्च, शार्दुल मिचेल, मिचेल सँटनर. , मुस्तफिजुर रहमान, रिचर्ड ग्लेसन, अवनीश राव अरावली, डेव्हन कॉनवे यांना रिलीज केलं होते.