FD Interest Rates : मुदत ठेव (Fixed Deposit) हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय मानला जातो. या ठेवींवर मिळणारे व्याजदर कमी असल्याने अनेकजण यात गुंतवणूक करणे टाळतात. मात्र, अनेक बँका अशा आहेत, ज्या 1 वर्षाच्या एफडीवर 7 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देत आहेत. कोणत्या बँक खातेधारकांना एफडीवर सर्वाधिक व्याजदर देतात, त्याविषयी जाणून घेऊयात.
डीसीबी बँक ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याज देत आहे. त्याचप्रमाणे, तमिळनाड मर्केंटाइल बँक सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर 7.25% आणि सीनियर सिटीझनला 7.75% व्याज देत आहे.
कॅनरा बँक देखील ग्राहकांना मुदत ठेवींवर चांगले व्याज देते. ही बँक ग्राहकांना 1 वर्षांच्या ठेवीवर 7 टक्के व्याज देते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 7.50% आहे. बँक ऑफ इंडिया ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर 7% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एफडी केल्यास तुम्हाला 6.80% व्याज मिळेल. या बँकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवर व्याजदर 7.30% आहे. याशिवाय, बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 1 वर्षांवरील एफडीवरील नियमित व्याजदर 6.75% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25% व्याजदर आहे.
कर्नाटक बँकेच्या ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर 7% व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 7.40% आहे. Deutsche Bank आणि आरबीएल बँक 1 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देते. तर आरबीएल बँकचे ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याजदर 7.50% आहे.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)