छाया कदम दिसणार नव्या भूमिकेत; चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Chhaya Kadam New Film| अभिनेत्री छाया कदम यांनी अनेक हिंदीसह मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच कान्स चित्रपट महोत्सवात त्यांची चांगली चर्चा रंगली होती. यानंतर आता छाया कदम नव्या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘बारदोवी’ असे या चित्रपटाचे नाव असून याचे पोस्टरही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ‘बारदोवी’ या आगामी चित्रपटाची सहनिर्मितीही छाया कदम यांनी केली आहे. त्यामुळे या चित्रपटानिमित्त त्यांनी वेगळी जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर छाया कदम शाल पांघरून करारी नजरेनं पाहतना दिसत आहे. छाया कदम यांची आतापर्यंतची प्रत्येक भूमिका वेगळी आहे. प्रत्येक भूमिकेतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. छाया कदम यांची मुख्य भूमिका आणि त्यांची पहिलीच सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाबाबत चाहत्यांची देखील उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Chhaya Kadam New Film|
View this post on Instagram
दरम्यान, अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. संतोष बळीराम तांबे, रविराज शिवाजी वायकर, अभिजित सुमन वसंत पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत “बारदोवी” या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन करण शिवाजीराव चव्हाण यांनी केले आहे. छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहे. Chhaya Kadam New Film|
हेही वाचा:
ॲक्शन सीन शूट करताना उर्वशी झाली, ‘गंभीर जखमी’





