पिंपरी | महापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चारुशिला जोशी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची सन 2023-2028 या पंचवार्षिक पदाधिकारी निवडीकरिता सोमवारी (दि.22) संचालक मंडळाची सभा पार पडली. या सभेत पतसंस्थेच्या चेअरमनपदी चारुशिला जोशी यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय व्हाइस चेअरमनपदी विजय नलावडे, सेक्रेटरीपदी योगेश रानवडे तर खजिनदारपदी विशाल भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष लादे यांचे अध्यक्षतेखाली व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी पतसंस्थेचे पदाधिकारी व विद्यमान संचालकांनी अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेचा कारभार, तत्पर सेवा व पारदर्शक व्यवहार योग्यरित्या चालविण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी संस्थेचे विद्यमान संचालक व माजी पदाधिकारी सनी कदम, वैभव देवकर, विजया कांबळे, विश्वनाथ लांडगे, अनिल लखन, शिवाजी येळवंडे, संदीप कापसे, नथा मातेरे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, कृष्णा पारगे, गणेश गवळी, अभिषेक फुगे
ज्ञानेश्वर शिंदे, विजय मुंडे, युनुस पगडीवाले व संस्थेचे सल्लागार मनोज माछरे, नितीन समगीर, संजय कापसे, मंगेश कलापुरे, उमेश बांदल, चंद्रशेखर गावडे, विशाल बाणेकर व प्रभागातील संघटनेचे पदाधिकारी व व्यवस्थापक प्रल्हाद सुतार व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.





