Charleston Open : सानिया-ल्युसीला उपविजेतेपद

नवी दिल्ली – भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने चेक प्रजासत्ताकची सहकारी खेळाडू ल्युसी हिच्या साथीत खेळताना चार्ल्सटन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे उपविजेतेपद मिळवले. या जोडीने या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना विजेतेपदाच्या लढतीत स्लोव्हेनियाच्या आंद्रेया क्लेपाक व पोलंडच्या मेग्डा या जोडीने एक तास 24 मिनिटे रंगलेल्या सामन्यात 6-2, 4-6, 10-7 असे पराभूत करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेच्या महिला एकेरीत स्वित्झर्लंडची नवोदित टेनिसपटू बेलिंडा बेनकीने विजेतेपद पटकावले. तिने अंतिम लढतीत एकेरीच्या फायनलमध्ये ट्युनिशियाच्या ओंस जेंबूरला दोन तास 35 मिनिटांत 6-1, 5-7, 6-4 असे पराभूत केले. या विजेतेपदासह तिने आपल्या कारकिर्दीतील सहावे डब्ल्यूटीए विजेतेपदही साकार केले. बेनकी ही 23 वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकणारी स्वित्झर्लंडची पहिलीच महिला टेनिसपटू ठरली.





