पंजाबात चन्नींचे आठ मोफत सिलींडरचे आश्वासन
Updated On:

अमृतसर – पंजाबात कॉंग्रेस सत्तेवर आली तर वर्षाला आठ गॅस सिलिंडर मोफत दिले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी दिले आहे. ते म्हणाले की, राज्यातील गरीबांची विशेषत महिलांची कॉंग्रेसला चिंता आहे.
त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू. महिलांना दर महा 1100 रूपयांची मदत केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. या आधीही पंजाबात कॉंग्रेसने अनेक निवडणूक आश्वासने दिली आहेत. त्यात आता या आठ सिलिंडरच्या आश्वासनाची भर पडली आहे. वर्षाला आठ मोफत सिलिंडर असे हे प्रमाण असणार आहे.
केंद्राने गॅस सिलिंडरवरील सबसीडी काढून टाकल्याने सामान्य ग्राहकांना आता जवळपास एक हजार रूपये दरमहा गॅस सिलिंडवर खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे सामान्य नागरीक चांगलाच जेरीला आला आहे त्या मुळे कॉंग्रेसने हे नवे आश्वासन तिकडे दिले आहे.





