बकरी ईदच्या सुट्टीत बदल; शासनाचा नवा निर्णय जाहीर
Updated On:

पुणे – राज्य शासनाने बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी गुरुवारी (दि. 29) जाहीर केली आहे. यापूर्वी राज्य शासनाने 2023 या वर्षाकरता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी बुधवारी (दि 28 जून) दर्शविण्यात आली होती. तथापि, ईद गुरुवारी येत आहे.
त्यामुळे 28 जूनची सुट्टी शासनाने रद्द करून गुरुवारी जाहीर केली आहे. याबाबतचे पत्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल यांनी काढले आहे. त्यामुळे गुरुवारी सर्व शासकीय कार्यालये, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयासह बंद राहणार आहेत.
टॅग्स:





