जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या नियमांत बदल
Updated On:

लुसान – बेलग्रेड येथे जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धा येत्या रविवारपासून सुरू होत असून त्यासाठी काही नियमांत बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेपासून मानाचा पट्टा आणि परंपरागत लाल-निळ्या ग्लोव्हजऐवजी पांढरे ग्लोव्हज वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेने दिली आहे.
स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण आणि रजतपदके दिली जाणार आहेत. विजेत्याला मानाचा पट्टा, पदक आणि रोख पारितोषिक असे बक्षीस मिळेल.
या स्पर्धेत एकूण तब्बल 26 लाख डॉलर रकमेची रोख पोरितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या खेळाडूंना त्यांच्या क्रीडा साहित्यावर त्यांच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यासही परवानगी देण्यात आली.





