Change In Railway Rule : रेल्वे नियमात मोठा बदल ! 1 जुलैपासून ‘या’ लोकांना बुक करता येणार नाही तिकीट

नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार रेल्वेच्या तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार आता आधारकार्ड प्रमाणीकरण नसेल तर युजरला तत्काळचे तिकीट काढता येणार नाही. 1 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून पोस्ट करून याची माहिती दिली होती.
रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी एक सर्क्युलर सर्व झोनला जारी केले होते. तत्काल तिकीट सेवेचा लाभ योग्य प्रवाशांना मिळावा यासाठी आता युजरना त्यांचे आधारकार्डचे ई-व्हेरीफिकेशन करावे लागणार आहे. त्यामुळे 1 जुलै 2025 पासून आयआरसीटीसीच्या वेबसाईट वा ऐपद्वारे केवळ आधार व्हेरीफिकेशन केलेल्या युजर्सना तिकीट बुक करता येणार आहेत. तसेच 15 जुलै पासून Tatkal Booking साठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण देखील अनिवार्य करण्यात आले आहे.
Bharatiya Railways will soon start using e-Aadhaar authentication to book Tatkal tickets.
This will help genuine users get confirmed tickets during need.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 4, 2025
या शिवाय रेल्वे तिकीट एजंट देखीस आता तत्काळ तिकीट बुकींग ओपन झाल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत तिकीट बुक करु शकणार आहेत. AC क्लाससाठी सकाळी 10:00 वा. ते 10:30 वा.पर्यंत वेळ असणार आहे. तर नॉन एसी क्लाससाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत ही वेळ असणार आहे.
IRCTC च्यामते देशात त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या 13 कोटीहून अधिक आहे. मात्र त्यातील फक्त देशात केवळ १० टक्के युजरच आधार व्हेरीफाईड आहेत. त्यामुळे ‘तात्काळ’ तिकीट बुकिंग प्रक्रियेला आणखी मजबूत बनवण्याच्या उद्देश्याने भारतीय रेल्वेने नियमांना कठोर करीत केवळ आधार व्हेरीफाईड आयआरसीटीसी अकाऊंटलाच Online Tatkal Ticket Booking करण्याची परवानगी दिलेली आहे.





