चंदुकाका सराफतर्फे ‘विवाह तस्मै वेडिंग कलेक्शन’; सोन्याच्या दागिन्यांवर रु. 151 प्रति ग्रॅम सूट !

पुणे : लग्नसराईच्या सध्याच्या काळात चंदुकाका सराफतर्फे विवाह समारंभासाठी खास घडविण्यात आलेल्या अलंकारांचे नवीन कलेक्शन सादर करण्यात आले आहे. ‘विवाह तस्मै’ या नव्या कलेक्शनमध्ये नववधूसाठी नाविन्यपूर्ण विवाहसाज तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पारंपारिक व नवीनता यांचा सुरेख संगम साधण्यात आलेला आहे.
सर्वोत्कृष्ट कलाकुसर हे या दागिन्यांचे खास वैशिष्ट्य आहे. या कलेक्शनमध्ये सोने व हिऱ्यांच्या मनमोहक अलंकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. रु. 7 लाख व त्यापुढील सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर रु. 151 प्रति ग्रॅम सूट देण्यात आलेली आहे. तसेच सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना किमान रु. 101 प्रति ग्रॅम सूट मिळणार आहे.

त्याचप्रमाणे हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% पर्यंत सूट देण्यात येत आहे. ‘विवाह तस्मै’ हे वेडिंग कलेक्शन चंदुकाका सराफ यांच्या स्टोअरमध्ये प्रस्तुत करण्यात आले आहे. तेव्हा तुमच्याही घरात लग्नकार्य ठरले असेल, तर चंदुकाका सराफ यांच्या स्टोअरला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन चंदुकाका सराफ प्रा. ली. यांचे संचालक श्री. किशोरकुमार जिनदत्त शहा व कु. सम्यक किशोरकुमार जिनदत्त शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे. ऑफर मर्यादित कालावधी साठी. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: 1800 267 8555.





