Pune News : चंदुकाका सराफ ज्वेल्सचे प्राईम स्टोअर आता रावेतकरांच्या सेवेत
Pune News : महाराष्ट्रातील सुवर्णविश्वातील अग्रगण्य आणि विश्वासू ब्रँड चंदुकाका सराफ ज्वेल्सचे भव्य प्राईम स्टोअर आता रावेत येथे ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे.

Pune News : दागिन्यांच्या क्षेत्रात दोनशे वर्षांची समृद्ध परंपरा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स प्राईम स्टोअर या २६ व्या नव्या शोरूमचा भव्य उदघाटन सोहळा रावेत, पुण्यामध्ये ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न झाला. (Pune News)
यावेळी पिं. चिं. मनपाचे नगरसेवक दीपक मधुकर भोंडवे, मोरेश्वर भाऊ भोंडवे, नगरसेविका रेश्माताई भुजबळ, ऐश्वर्या ताई तरस, सामाजिक कार्यकर्त्या अंजना गायकवाड, युवा उद्योजक पराग पिंगट, उमाकांत समधिया व चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक – सिद्धार्थ शहा, आदित्य शहा, संगीता शहा, दामिनी शहा, स्विटी बागी, साहस बागी व आदि मान्यवर उपस्थित होते. (Pune News)
सुमारे २०० वर्षांच्या शुद्ध सोन्याच्या वारसा पुढे नेत ग्राहकांना उत्कृष्ट गुणवत्ता, आकर्षक डिझाइन्स आणि पारदर्शक व्यवहाराचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हे नवीन दालन सुरू करण्यात आले आहे. रावेत आणि परिसरातील ग्राहकांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. (Pune News)
उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष मेगा ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. मजुरी फक्त ३.९९% ते ९.९९% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर १००% पर्यंत सूट देण्यात येत आहे. याशिवाय, चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट ३०% सूट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पारंपरिक दागिन्यांसोबतच आधुनिक डिझाइन्सची खरेदी अधिक फायदेशीर दरात करण्याची संधी मिळणार आहे.या सर्व ऑफर्स ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत लागू असणार आहेत. (Pune News)
चंदुकाका सराफ ज्वेल्सचे नवीन प्राईम स्टोअर सर्व्हे नं ९५, प्रतिभा अव्हेन्यू, भोंडवे बागेसमोर, रावेत, पुणे येथे सुरु झाले असून आधुनिक सुविधा आणि उच्च दर्जाच्या सेवेसह उत्कृष्ठ खरेदीचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. (Pune News)
उदघाटन समारंभानिमित्त देण्यात येणाऱ्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी व सणासुदीच्या आणि आगामी शुभमुहुर्ताच्या पार्श्वभूमीवर नवीन डिजाइनमधील सोन्याचे दागिने खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि आत्ता रावेतकरांसाठी ही उत्तम वेळ आहे. (Pune News)
सोन्याचे कमी झालेले दर आणि ग्राहकांसाठी आम्ही देत असलेल्या या विशेष ऑफर्स याचा एकत्रित लाभ घेण्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या नूतन शाखेला आपल्या कुटुंबासह लगेचच भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक सिद्धार्थ शहा व आदित्य शहा यांनी केले आहे. (Pune News)





