Chandrayaan 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं इस्रोचं अभिनंदन; दिल्या खास शुभेच्छा..!!

Updated On:

श्रीहरीकोटा – भारतासोबत संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोच्या ‘चांद्रयान-3’ या मोहिमेकडे लागल्या होत्या. जिथे चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असताना. आता ‘चांद्रयान-3’लँडरचे यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग झाले असून, आज इस्रोने इतिहास रचला आहे.

‘चांद्रयान-3’चे यशस्वीपणे लँडिंग झाल्यामुळे देशवासियांमध्ये आनंदाचे वरावरण निर्माण झाले आहे. भारताच्या चांद्रयान-3 ने चांद्रभूमीला यशस्वी स्पर्श केला आहे. त्यामुळे तमाम भारतीयांच स्वप्न साकार झालय. चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोचं अभिनंदन केले. त्याशिवाय देशभरातील नागरिकांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज चंद्रावर उतरुन भारताने इतिहास रचला आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. सध्या प्रत्येक भारतीय जल्लोष करत आहे. अखंड भारतासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची, भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेलीय…

ऊर आनंदाने भरून आलाय… आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय… गर्वय मला, मी भारतीय असल्याचा, प्रत्येक घरात उत्सव सुरु झालाय. ह्दयापासून मी माझ्या देशवासियांसोबत जोडलेलो आहे. मी टीम इस्रो, सगळ्या वैज्ञानिकांना मनापासून शुभेच्छा देतो… असं देखील मोदी यावेळी म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

2026-10-08 22:14:41

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Himanta Biswa Sarma : ...तोपर्यंत तुम्ही मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही; 'या' नेत्याचा राहुल गांधींना इशारा

2026-10-08 17:58:49

Himanta Biswa Sarma : ...तोपर्यंत तुम्ही मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही; 'या' नेत्याचा राहुल गांधींना इशारा