फडणवीसांऐवजी चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री पद द्यावे – आशिष देशमुख
Updated On:

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचे आव्हान होते. फडणवीस विजयी झाले असले तरीही त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही.
आशिष देशमुख म्हणाले कि, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या असून देवेंद्र फडणवीसांनाही अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री पद द्यावे. प्रचारादम्यान देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारत त्यांना आधीपेक्षा जास्त मोठी जबाबदारी देण्याची घोषणा केली होती, असे देशमुखांनी सांगितले.





