Chandrashekhar Azad : लाठीमाराच्या निषेधार्थ चंद्रशेखर आझाद रस्त्यावर; मुसळधार पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलन
Chandrashekhar Azad : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा 32 वा दिवस आहे.

Chandrashekhar Azad : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा 32 वा दिवस आहे. (Chandrashekhar Azad)
सोमवारी पक्षाने संसद भवनावर मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरच अनेक आंदोलकांना अडवले. तरीही काही आंदोलक संसद भवनापासून काही अंतरापर्यंत पोहोचले. (Chandrashekhar Azad)
त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून काहींच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेनंतर भीम आर्मीचे संस्थापक आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी सोमवारी रात्री संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सुरू केले. दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू असतानाही ते छत्री घेऊन पुतळ्याखाली ठिय्या देऊन बसले होते. (Chandrashekhar Azad)
ज़ुल्म जब भी हद से आगे बढ़ने लगता है,
वहीं से बदलाव का सूरज निकलने लगता है।आज जंतर-मंतर पर बच्चों और बच्चियों के साथ जिस प्रकार का बर्बरतापूर्ण व्यवहार किया गया, उसने मन को गहराई तक झकझोर दिया। मैंने जलियांवाला बाग का वह दौर नहीं देखा, लेकिन आज जो दृश्य सामने आए, उन्होंने… pic.twitter.com/iaLOkDTv5c
— Chandra Shekhar Aazad (@BhimArmyChief) July 20, 2026
विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध करताना चंद्रशेखर आझाद म्हणाले, “आज जंतरमंतरवर तरुण-तरुणींवर जे घडले, ते पाहून मन व्यथित झाले. मी जालियनवाला बाग हत्याकांड पाहिले नाही, पण आजची घटना त्या काळ्या अध्यायाची आठवण करून देणारी होती. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. जर तो अधिकार बळाचा वापर करून दडपला जात असेल, तर तो लोकशाही मूल्यांवर थेट आघात आहे.” (Chandrashekhar Azad)
ते पुढे म्हणाले, “याच वेदनेतून आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मी संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली शांततापूर्ण धरणे आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जप्रकरणी जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई होईपर्यंत माझा संघर्ष सुरू राहील.” (Chandrashekhar Azad)
जहाँ संविधान की शपथ ली, आज वहीं संविधान का सम्मान बचाने बैठा हूँ।
मासूमों पर हुए अत्याचार के विरुद्ध अपना कर्तव्य निभा रहा हूँ।
जय भीम, जय भारत।#संसद_मार्च #जंतर_मंत्र pic.twitter.com/J2ENfzZdNP— Chandra Shekhar Aazad (@BhimArmyChief) July 21, 2026
चंद्रशेखर आझाद यांनी सुरुवातीपासूनच दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रविवारी रात्री जंतरमंतरवरील आंदोलन उधळण्यासाठी काही जण येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर आझाद यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संपूर्ण रात्र जंतरमंतरवर ठिय्या देत आंदोलकांच्या सुरक्षेसाठी उपस्थिती लावली होती.





