संजय राऊत यांच्याकडून कसिनोमधील फोटो ट्विट केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..

मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मकाऊ कसिनोमधील एक फोटो ट्विट केला आणि एकच खळबळ उडाली. या फोटोनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे.राऊत (Sanjay raut twitt) यांनी केलेल्या ट्विटमध्ये थेट नाव घेणं टाळलं असलं तरी हा फोटो भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा असल्याची माध्यमांमध्ये चर्चा सुरु झाली. फोटो शेअर करत राऊतांनी “महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत (Macau casino) जुगार खेळत असल्याचा” आरोप संजय राऊतांनी (Sanjay raut twit) केला आहे.राऊतांच्या या आरोपांना आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटने उत्तर दिल आहे. (Chandrashekhar bawankule casino viral photo)
संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर दोन फोटो ट्वीट केले आहेत. त्यावर,“महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा.. ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…”असे एका फोटोवर म्हटले आहे.
तर दुसरा फोटो शेअर करत, “१९ नोव्हेंबर… मध्यरात्री… मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन… साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?” असा खोचक टोला देखील यावेळी संजय राऊतांनी लगावला आहे.
19 नोव्हेंबर
मध्यरात्री
मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine.
साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.
हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?
ते तेच आहेत ना?@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @AmitShah pic.twitter.com/XlScC63h2Q— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
बावनकुळेंनी दिल स्पष्टीकरण
संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर बावनकुळेंनी देखील आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून याबाबत खुलासा केला आहे. बावनकुळे म्हणतात,”मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे” (Bawankule on sanjay raut)
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे. pic.twitter.com/yzqdrmFh0Y
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 20, 2023
भाजपचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
राऊत यांच्या ट्विटनंतर महाराष्ट्र भाजपने एक फोटो ट्विट केला आहे. आदित्य ठाकरे देखील या फोटोमध्ये दिसून येताहेत. भाजपने हा फोटो ट्विट करत लिहिले,”आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत.ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर.असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की ?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. (Aditya thackeray glass wheesky)
आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत.
ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर.
असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ @rautsanjay61 , आदित्य… pic.twitter.com/TGCTOeNpYx— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 20, 2023
संजय राऊत यांनी बावनकुळे यांचा फोटो ट्विट केल्यानंतर भाजपने देखील आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्विट केल्याने आता पुन्हा एकदा ठाकरे समर्थक आणि भाजपमध्ये सोशल मीडियावर लढाई सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आता याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





