Chandrapur Election: चंद्रपूर महापौरपदाचा तोडगा सुटला; दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर कोण ठरलं वरचढ?
Chandrapur Election: काँग्रेस महासचिव के.सी वेणुगोपाल यांच्याकडे काल दिल्लीत बैठक झाली.

Chandrapur Election: महानगरपालिका निवडणुकांमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यानंतर महापौरपदासाठी खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटात मतभेद सुरू झाले.
अखेर आता येथील महापौरपदाचा तिढा सुटला आहे. काँग्रेस महासचिव के.सी वेणुगोपाल यांच्याकडे काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर चंद्रपूर महापालिकेच्या सत्तावाटपासंदर्भात तोडगा निघाल्याची माहिती समोर येत आहे. Chandrapur Election
वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही नेत्यांना स्वत:च्या गटाचा महापौर आणि गटनेता पाहिजे होता. मात्र या वादावर तोडगा म्हणून हायकमांडने विजय वडेट्टीवार यांच्या गटाला काँग्रेसचे गटनेतेपद तर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौरपद देण्याचा निर्णय घेतला.
दिल्ली गाठली
चंद्रपुरात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्या तरी विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील वादामुळे महापौरपदाचा तोडगा निघत नव्हता. शेवटी विजय वडेट्टीवारांनी त्यांच्या 18 समर्थक नगरसेवकांसह दिल्ली गाठली.
नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते के सी वेणूगोपाल यांच्या निवासस्थानी विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनिल केदार, खासदार श्यामकुमार बर्वे यांची एक बैठक पार पडली. Chandrapur Election
धानोरकरांच्या गटाला महापौरपद
त्यानुसार, खासदार प्रतिभा धानोरकरांच्या गटाला महापौरपद तर विजय वडेट्टीवार गटाला उपमहापौरपद आणि गटनेतेपद देण्याचा निर्णय झाला.
तर जो गट सोबत येईल त्यांना स्थायी समिती सभापतीपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसला बहुमतासाठी अजून चार नगरसेवकांची गरज असल्याने त्याची जमावाजमव करावी लागणर आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडे 6 तर वंचित बहुजन आघाडीकडे दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे उर्वरित चार नगरसेवकांसाठी प्रतिभा धानोरकरांना प्रयत्न करावे लागणार आहे. Chandrapur Election
हेही वाचा:
Pune District : काटी-लाखेवाडी गटासाठी विकासाचा अजेंडा जाहीर






