Chandramukhi Movie : ढोलकीच्या तालात रमलेली ‘चंद्रमुखी’ची भूमिका साकारणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

मुंबई – ‘पानिपत’, ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक ‘विश्वास पाटील’ यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंद्रमुखी चित्रपटाची निर्मिती अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा पाठमोरा ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी दिसत आहे. हा चेहरा कोण? असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर असून, चित्रपटात दौलतच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता “आदिनाथ कोठारे’ दिसणार असल्याचे स्पष्ठ झाले आहे.
मात्र, चित्रपटातील नृत्यागणा म्हणजेच, चंद्रमुखी कोण असणारा हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटातील कलाकारांबाबत गुप्तता बाळगून असलेल्या प्रसाद ओकने आता हळूहळू कलाकारांचे चेहरे रिलीज करण्यात सुरुवात केली आहे. ‘चंद्रमुखी’ चित्रपटात दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ दिसत असून चंद्राची भूमिका अभिनेत्री ‘मृण्मयी देशपांडे’ निभावणार असल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
त्यामुळे या चित्रपटातून आणखी एकदा मृण्मयी आणि आदिनाथ एकत्रित स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. साटं लोटं सगळं खोटं या चित्रपटातून हे दोघेही एकत्रित पाहायला मिळाले होते. या दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाची उत्कंठा अधिक वाढली आहे. चंद्रमुखी चित्रपट 29 एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.






