Chandrakant Patil : ‘समाजाच्या भावनांना न्याय मिळाला’ ; जैन हॉस्टेल प्रकरणी चंद्रकांत पाटलांकडून फडणवीसांचे कौतुक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जैन हॉस्टेलबाबतचा व्यवहार रद्द करण्याचा आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिल्यामुळे जैन समाजाच्या भावनांना न्याय मिळाल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाला न्याय देण्याची भुमिका घेतली होती. विकसकाने व्यवहार रद्द करण्यासाठी केलेला अर्ज, त्यानंतर ट्रस्टने व्यवहारातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाला दिलेली ग्वाही या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांनी सामाजिक सलोखा जपणारी भूमिका घेत परस्परमान्यतेने हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळेजैन मुनींचाही सन्मानपूर्वक आदर करण्यात आला आहे. याविषयी जैन समाजाने घेतलेल्या सामजंस्यपूर्वक भूमिकेबद्दल त्यांचे आभार.भारतीय जनता पक्षावर समाजाच्या असलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी आम्ही सतत घेत असतो. आता या प्रकरणी सुरू असलेली चिखलफेक थांबवावी. पुण्यातले वातावरण आणखी गढूळ करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.





