चंद्रकांत पाटील म्हणजे कोथरूडकरांसाठी आरोग्यदूत; शहर सरचिटणीस लहू बालवडकर यांचे मत

पुणे – “आरोग्यं धनसंपदा…’ या उक्तीनुसार आरोग्य उत्तम राखण्यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात. पण, अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना दुखणी अंगावरच काढावी लागतात. हे लक्षात घेऊन कोथरूड मतदारसंघातील सर्वांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.
त्यातूनच कोथरूडकरांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यामुळे चंद्रकांत पाटील कोथरूडकरांसाठी आरोग्यदूत ठरले आहेत, असे मत भाजपचे पुणे शहर चिटणीस लहू बालवडकर यांनी व्यक्त केले.
बालवडकर म्हणाले, “फिरता दवाखाना, आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरे, गुंतागुंतीच्या आजारांवर उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांपर्यंतची मदत यांसाठी पाटील यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
तसेच कोथरूडकरांसाठी सांधे, मणके आणि स्नायूंच्या समस्या दूर करण्यासाठी मोफत आयुर्वेदिक सल्ला शिबिरेही आयोजित केली. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरही पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात आले.
कोथरूडकरांच्या आरोग्याची सेवा करणाऱ्यांना विसरून कसे चालेल? त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुतार दवाखान्यात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा पाटील यांनी विशेष सन्मान केला. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदी येथे येणाऱ्या वारकरी बांधवांसाठी आरोग्य सेवा शिबिर आयोजित करणे.
योगविद्येच्या माध्यमातून आरोग्य सुदृढ राहण्यासाठी “मानसी’ उपक्रम, उपचारांसाठी मुंबईत जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वास्तव्यासाठी सावली केअर सेंटरची उभारणी, कोविड काळात रुग्णांना वैद्यकीय मदत, करोना वॉरिअर्सना पीपीई किटचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपी कॅम्प असे विविध उपक्रम चंद्रकांत पाटील यांनी राबविले आहेत. आरोग्यविषयक विविध उपक्रमांमुळे कोथरूडच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपयुक्त उपक्रमांचे आयोजन पाटील केले आहे, असेही बालवडकर यांनी सांगितले.





