चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर – चंद्रकांत पाटील

संग्रहित छायाचित्र

नागपूर – युतीच्या जागावाटपावर 2014ला जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही. चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाईल, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यमान जागांव्यतिरिक्त चर्चा करण्याबाबत विधान केले होते.

नागपूरमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा यावर शिक्कामोर्तब केले आहे. विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये जागा वाटपात एकमेकांच्या सीटिंग जागांना हात लावायचा नाही, ही भाजप आणि शिवसेना दोघांचीही मानसिकता असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. या विधानामुळे शिवसेना आणि भाजप फिफ्टी-फिफ्टी जागांचे गणित कस साधणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आमचे 122 आमदार आणि आमच्यासोबत असलेले अपक्ष सहा आणि नव्याने आलेले चार असे 132 आमदार सीटिंग आहेत. मग आम्हाला 50 टक्के म्हणजे 135 जागा द्यायच्या म्हटल्यावर आणखी तीनच जागांवरच चर्चा होईल. याची जाणीव आम्हाला जशी आहे तशीच शिवसेनेला देखील आहे. जागावाटप करताना राज्यभरातील जागांचा एकूण विचार केला जाईल, असेही त्यांनी म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)