औरंगाबाद – शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर मंगळवारी रात्री पुण्याच्या कात्रज चौकात हल्ला करण्यात आला होता. दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या हल्ल्याला समर्थन नसल्याचं म्हटल आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी बंडखोरांना इशाराही दिला आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले, “हल्ल्याचं समर्थन मी करणार नाही. पण हल्ला का होतो? जो उठतो तो फुटीर आमदार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर बोलायला लागला आहे,” अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. पुढे ते म्हणाले,, “एक तर तुम्ही फुटले, त्यात तुम्ही पक्षाच्या नेत्यांबद्दल असं उलटं बोलता. ते शिवसैनिक सहन करणार नाहीत,” असंही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा जुना व्हिडीओ शेअर करत इम्प्तियाज जलिल यांची टीका; म्हणाले…
“…तर तुमची पण कोणत्या ना कोणत्या राज्यात ईडी होईलच सुरु”
“आदित्य ठाकरे फक्त एक आमदार आहेत”, असं म्हणणारे पुण्यातील बंडखोर नेते तानाजी सावंत यांच्यावरही खैरे यांनी टीका केली. “तानाजी म्हणतो मी आदित्यला ओळखत नाही. मागे मागे फिरायचा तो आदित्य ठाकरेंच्या. आता ओळखत नाही असं म्हणतो. ही कोणती पद्धत आहे. तानाजी आदित्य ठाकरेंबद्दल बोलतो, उद्धव ठाकरेंबद्दल बोलतो. कशा करता बोलतो? तुम्ही काय मोठे शिक्षण सम्राट आहात म्हणून बोलता का? तुमची पण कोणत्या ना कोणत्या राज्यात ईडी होईलच सुरु,” असं तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करताना खैरे म्हणाले.