मुंबई – एकनाथ शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारवर हल्ला झाला होता. याप्रकरणी काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदे गटातून आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनीही याबाबत भाष्य केले आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले, “आमच्या आमदारांवर असे हल्ले होत असेल, तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील. या हल्ल्याचा जितका निषेध करावा, तितका कमी आहे. ही तत्वाची लढाई आहे, ती निश्चित लढावी. पण असा हल्ला करणं चुकीचं आहे. एकाकडून मारल्या जात असेल तर दुसऱ्याकडून बघायची भूमिका घेतल्या जाऊ शकत नाही, असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
हल्ला करणाऱ्या दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच या हल्ल्या मागे कोण आहे, याचा सुद्धा शोध घ्यायला हवा, असेही ते म्हणाले. शिवसेना नेते बबन थोरात यांनी दिसेल तिथे आमदारांच्या गाड्या फोडा, त्यांचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल, असे वक्तव्य केले होते. याबाबतही अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ यांना जयंतीनिमित्त अभिवादन
”बबन थोरात यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई होईल. कोणी असे वक्तव्य करत असेल आणि उद्धव ठाकरे त्यांचा सत्कार करत असतील, तर उद्धव ठाकरेंचा यासर्व प्रकाराला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
बेरोजगारी हटवण्याची मोदी सरकारची आश्वासने खोटी – महेश तपासे