Champion Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ओपनिंग सेरेमनीची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीला 20 दिवस शिल्लक राहिले आहेत. या चॅम्पियन्स ट्रॉफीकडे संपूर्ण क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. यादरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ओपनिंग सेरेमनीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ओपनिंग सेरेमनीची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या सहकार्याने 16 फेब्रुवारी 2025 रोजी लाहोरमध्ये आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन समारंभ आयोजित केला जाणार आहे.
ऐतिहासिक लाहोर किल्ल्याच्या हुजुरी बागेत उद्घाटन समारंभ होणार आहे. ज्यामध्ये विविध मंडळांचे अधिकारी, सेलिब्रिटी, क्रीडा दिग्गज आणि सरकारी अधिकारी आमंत्रित केले जातील. या उद्धटनानंतर फोटोशूट पार पडणार आहे. त्यानंतर सर्व संघाच्या कर्णधारांच्या पत्रकार परिषदा पार पडणार आहे. पीसीबी 7 फेब्रुवारी रोजी नूतनीकरण केलेल्या गद्दाफी स्टेडियमचे अधिकृत उद्घाटन करणार आहे, ज्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
रोहित शर्मा जाणार का?
या सोहळ्याला रोहित शर्मा जाणारा का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तो जाणार कि नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पाकिस्तानने अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केलेला नाही.
हायब्रीड मॉडेलवर स्पर्धा पार पडणार
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सामने ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत पाकिस्तानातील तीन शहरे (रावळपिंडी, कराची आणि लाहोर) आणि दुबई येथे आयोजित केले जातील. BCCI ने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने हायब्रिड-मॉडेल स्वीकारले होते. यानुसार भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. आणि जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर 9 मार्च रोजी युएई शहरात विजेतेपदाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया (Champions Trophy 2025 India squad)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संपूर्ण वेळापत्रक….
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (नॅशनल स्टेडियम, कराची)
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
01 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
02 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गटविभागणी –
अ गट- पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश.
ब गट- दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड.





