Champions Trophy 2025 : IND vs NZ फायनल सामना ‘टाय’ झाला, तर कोण विजेता ठरणार? जाणून घ्या ICCचा नियम

IND vs NZ final match What will happen if end of Tie : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबईत खेळला जाणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेत टीम इंडिया आतापर्यंत अपराजित राहिली आहे. त्याचबरोबर मिचेल सँटनरच्या नेतृत्त्वाखालील न्यूझीलंडने फक्त एक सामना गमावून अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे दोन्ही संघ शेरास सव्वाशेर आहेl. त्यामुळे दोन्ही संघातील अंतिम सामना जर ‘टाई’ झाला तर कोणता संघ ट्रॉफीवर नाव कोरणार? काय आयसीसीचा नियम जाणून घेऊया.
आयसीसीच्या बाद फेरीत न्यूझीलंडने भारताला आणलेय अडचणीत –
आयसीसीच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये भारतावर अनेकदा न्यूझीलंडचे वर्चस्व राहिले आहे. त्यांनी २००० च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि २०२१ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पराभूत केले आहे. दुसरीकडे, २०२३ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने आतापर्यंतचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले असल्याने, संघाला तेथील परिस्थितीची चांगली जाणीव आहे. म्हणूनच या अंतिम सामन्यासाठी भारताला जेतेपदाता प्रबळ दावेदार मानले जात आहे.
IND vs NZ अंतिम सामना ‘टाय’ झाला तर काय होणार?
🇮🇳 🆚 🇳🇿 for the final showdown 🥵
🗓️ Sunday, 9th March
⏰ 1PM local time
🏟️ Dubai International Cricket Stadium#INDvNZ #ChampionsTrophy pic.twitter.com/QIYCpxpJuS— ICC (@ICC) March 8, 2025
तुम्हाला आठवत असेल तर, २०१९ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता. तो सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, त्यानंतरही सामना बरोबरीत राहिला. परिणामी, ‘बाउंड्री काउंट’ नियमानुसार इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. त्या नियमाबाबत त्या सामन्यानंतर बराच वाद झाला. या कारणास्तव, नंतर ‘बाउंड्री काउंट’ नियम रद्द करण्यात आला. आता सामन्याचा जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यत सुपर ओव्हर्स खेळवण्याचा नियम आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड –
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डमध्ये टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. दोघांमधील एकूण ११९ सामन्यांपैकी भारताने ६१ सामने जिंकले आहेत, तर ब्लॅककॅप्सने ५० सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला. सात सामने अनिर्णीत राहिले. आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघांमध्ये समान स्पर्धा राहिली आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये दोघेही १२ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. भारत आणि न्यूझीलंड दोघांनीही प्रत्येकी सहा सामने जिंकले आहेत.





