Champions Trophy 2025 : श्रीलंका दौऱ्यावर फ्लॉप ठरले भारताचे ‘हे’ 3 स्टार फलंदाज, चॅम्पियन्स ट्रॉफीतून होऊ शकतो पत्ता कट!

Team India & Champions Trophy 2025 : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील बहुतांश फलंदाज फ्लॉप ठरले. रोहित शर्माशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने चांगली फलंदाजी केली नाही. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची तयारी करत आहे. याआधी भारतीय संघातून तीन फलंदाजांचा पत्ता कट होऊ शकतो. शुभमन गिल, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर फॉर्ममध्ये नसतील तर टीम इंडियाला पर्यायाची गरज भासू शकते.
शुभमन श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सलामीवीर म्हणून खेळला होता. पण त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. गिल तिसऱ्या वनडेत अवघ्या 6 धावा करून बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता तर पहिल्या वनडेत 16 धावा करून गिल बाद झाला. तो फॉर्ममध्ये नसेल तर टीम इंडियाला पर्यायाची नक्कीच गरज भासेल. गिल बऱ्याच दिवसांपासून फॉर्मशी झुंजत आहे.
श्रेयस अय्यर दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात परतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीनही सामन्यांपैकी तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पण त्यालाही विशेष काही करता आले नाही. पहिल्या वनडेत 23 धावा करून अय्यर बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ 8 धावा करता आल्या. टीम इंडिया मधल्या फळीसाठी अय्यरकडे पाहत आहे. मात्र सध्याचा त्याचा फॉर्म त्याला अडचणीत परत एकदा अडचणीचा ठरू शकतो.
Paris Olympics 2024 (Athletics) : सर्वोत्तम दिले, मात्र दिवस माझा नव्हता – नीरज चोप्रा
केएल राहुल हा भारताचा अनुभवी खेळाडू आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये तो टीम इंडियासाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळला. पण विशेष काही करू शकला नाही. राहुल एका सामन्यात 31 धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या वनडेत तो शून्यावरच बाद झाला. तो तिसऱ्या वनडेचा भाग नव्हता. राहुलचा फॉर्म असाच राहिला तर त्याचाही संघातून पत्ता कट होऊ शकतो.





