India vs Pakistan: पाकिस्तानचा टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या कुठे पाहता येईल हा महामुकाबला?

Champions Trophy 2025 | आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान या संघातील महामुकाबला आज (23 फेब्रुवारी) खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने टॉस पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर भारताने त्यांच्या पहिल्या सामन्यात 6 विकेट्स राखून बांगलादेशचा पराभव केला होता. पाकिस्तानला स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास हा सामना जिंकणे महत्त्वाचे असणार आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना दुबईतील मैदानावर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यासाठी भारताने संघात कोणताही बदल केलेला नाही. तर पाकने फखर झमानच्या जागी इमाम-उल-हकला संघात स्थान दिले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये IND vs PAK सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
23 फेब्रुवारी रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर IND vs PAK सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर सामना पाहू शकता. तुम्ही Jio Hotstar वर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
भारत vs पाकिस्तान: चॅम्पियन्स ट्रॉफी
मधील रेकॉर्डभारत vs पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 5 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 3 सामन्यात पाकचा तर दोन सामन्यात भारताचा विजय झाला आहे. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा पाकचा पराभव करत पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दबदबा निर्माण करण्याची भारताकडे संधी असेल.
India vs Pakistan: प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.
पाकिस्तान: इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर/कर्णधार), सलमान आगा, तैय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रीदी, नसीम शाह, हारिस रौफ, अबरार अहमद.





