Pune District | केळगाव खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्साहात
Updated On:

चिंबळी : चंपाषष्ठीनिमित्त केळगाव (ता. खेड) येथील खंडोबा महाराज मंदिराला विद्युत रोषणाई करून शनिवारी (दि. 7) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
केळगाव (ता. खेड) येथील खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठी निमित्त सकाळी दहा ते अकरा महापूजा व अभिषेक करण्यात आला तर त्यानंतर तळी भंडार करुन पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून श्रीफळ अर्पण करण्यासाठी चिंबळी, केळगाव, आळंदी, सोळू परिसरातील भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी तीननंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी केळगाव, हनुमानवाडी परिसरातील ग्रामस्थांनी संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांचे आयोजन समस्त ग्रामस्थ केळगाव (हनुमानवाडी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.





