Ankur Wadhave : ‘चला हवा येऊ दे फेम’अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला? पोस्ट अन् व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Ankur Wadhave : स्वतः अंकुरने फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली असून, या घटनेनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Updated On:

Ankur Wadhave : मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता अंकुर वाढवे याच्यावर पुसदमध्ये २० ते ३० जणांच्या जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वतः अंकुरने फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली असून, या घटनेनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अंकुर वाढवेने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले की, “काल पुसदमध्ये माझ्यावर २० ते ३० लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेतून पुसदमध्ये वाढणारी गुन्हेगारी स्पष्टपणे दिसून येते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.”

यानंतर अंकुर फेसबुक लाईव्हद्वारेही समोर आला आणि संपूर्ण घटनेचा खुलासा त्याने केला. त्याने सांगितले की, पुसदमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना काही मित्र त्याला भेटण्यासाठी आले होते. त्यापैकी काहींनी मद्यपान केले होते आणि शेजारच्या घराजवळ गैरवर्तन केल्याने वाद निर्माण झाला. परिस्थिती निवळल्यानंतरही एका तरुणाने ३० ते ४० जणांना घेऊन येत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : Laxman Hake : जरांगेंनी उपोषण मागे घेताच लक्ष्मण हाकेंची जहरी टीका; म्हणाले “कोणाचं तरी पॉलिटिकल कोअर…”

अंकुरच्या म्हणण्यानुसार, उपस्थितांपैकी काहींनी त्याला ओळखल्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली नाही. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, संबंधित तरुणाचे भविष्य खराब होऊ नये या हेतूने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल न करता त्याला माफ केल्याचेही अंकुरने स्पष्ट केले.

अंकुर वाढवे म्हणाला….

“या संपूर्ण घटनेतून मला एकच गोष्ट जाणवली, ती म्हणजे पुसदमध्ये वाढत्या गुन्हेगारीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे,” असे अंकुरने नमूद केले. सध्या त्याची पोस्ट आणि लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : Pune Satara Highway : गडकरींच्या दौऱ्यातच महामार्ग जाम! देगाव स्टॉपवर ऑइल गळतीमुळे गाड्या घसरल्या

आणखी संबंधित बातम्या

Supriya Sule : ‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांकडे केली मोठी मागणी

2026-10-15 11:22:13

Supriya Sule : ‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांकडे केली मोठी मागणी

Pradeep Purnekar case : "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो, पण..."; राजेंद्र शिंदे पोलिस चौकशीत काय म्हणाले? गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्याने खळबळ

2026-10-15 10:43:32

Pradeep Purnekar case : "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो, पण..."; राजेंद्र शिंदे पोलिस चौकशीत काय म्हणाले? गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्याने खळबळ

Farz Movie : 12 आठवडे चित्रपटगृहं होती रिकामी, तरी जितेंद्र यांनी हार मानली नाही; ‘फर्ज’च्या यशामागचा रंजक किस्सा

2026-10-15 08:34:20

Farz Movie : 12 आठवडे चित्रपटगृहं होती रिकामी, तरी जितेंद्र यांनी हार मानली नाही; ‘फर्ज’च्या यशामागचा रंजक किस्सा

Bharat Jadhav : अरे भरत कसा आहेस तू? नानांच्या त्या फोन कॅालची अभिनेत्याने सांगितली खास आठवण

2026-10-14 11:04:58

Bharat Jadhav : अरे भरत कसा आहेस तू? नानांच्या त्या फोन कॅालची अभिनेत्याने सांगितली खास आठवण

Eknath Shinde : पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! शिंदेंच्या शिवसेनेचा अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा?

2026-10-14 07:56:36

Eknath Shinde : पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! शिंदेंच्या शिवसेनेचा अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा?