Chhattisgarh Assembly Election Result 2023 Live Updates : छत्तीसगड येथे कॉंग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालात थेट लढत रंगत आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस या मुख्य पक्षात रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या ट्रेंडनुसार अस दिसतय की, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडनुसार भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होताना दिसत आहे. वृत्त लिहेपर्यंत भाजप पक्ष 52 जागांवर पुढे होता. तर काँग्रेस 36 आणि इतर 2 जागांवर पुढे आहे. दरम्यान, ही आकडेवारी निवडणूक निकाल नसून सुरुवातीचे कल आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार bjp आघाडीवर दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार भाजप 51 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 1 आणि सीपीआय 1 जागेवर आघाडीवर दिसत आहे. आतापर्यंत एकूण 89 जागांचे ट्रेंड आले आहेत.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र, कोणाच्या दाव्यात किती तथ्य आहे हे काही वेळात कळेल. राज्यातील बहुतांश जागांवर दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी केलेल्या कामांच्या जोरावर पुन्हा सरकार पुन्हा येईल, अशी काँग्रेसला आशा आहे, तर भाजपलाही सत्तेत येण्याची आशा आहे.
Chhattisgarh 2018 मध्ये विधानसभेच्या 90 जागांपैकी काँग्रेसने 68, भाजपने 15, बहुजन समाज पक्षाने दोन आणि पाच उमेदवार अपक्ष म्हणून विजयी झाले होते.