Duleep Trophy 2025 : रजत पाटीदारच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा! आरसीबीनंतर सेन्ट्रल झोनला पटकावून दिले जेतेपद

पाटीदार-राठोडचे मोलाचे योगदान –
सेंट्रल झोनच्या विजयात कर्णधार रजत पाटीदार आणि यश राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. साउथ झोनच्या पहिल्या डावात 149 धावांच्या प्रत्युत्तरात सेंट्रल झोनने 511 धावांचा डोंगर उभारला. पाटीदारने 12 चौकार आणि 2 षटकारांसह 101 धावांची शानदार शतकी खेळी केली. यश राठोडने 194 धावांची खणखणीत खेळी साकारली पण दुहेरी शतक थोडक्यात हुकवले. त्याच्या खेळीत 17 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. याशिवाय सारांश जैन (69) आणि दानिश मालेवार (53) यांनीही अर्धशतके झळकावली.
𝘾.𝙃.𝘼.𝙈.𝙋.𝙄.𝙊.𝙉.𝙎! 🏆
The Duleep Trophy 2025-26 winners 👉 𝘾𝙚𝙣𝙩𝙧𝙖𝙡 𝙕𝙤𝙣𝙚 🙌#DuleepTrophy | #Final pic.twitter.com/f9FPlX48T4
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 15, 2025
साउथ झोनने दुसऱ्या डावात 426 धावा करत चांगली झुंज दिली. सेंट्रल झोनसमोर विजयासाठी 65 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी पाचव्या दिवशी 21व्या षटकात 4 गडी गमावून सहज पूर्ण केले. यश राठोड याला त्याच्या 194 धावांच्या शानदार खेळीसाठी सामनावीर, तर सारांश जैन याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा – IND vs PAK : भारताने हस्तांदोलन टाळल्याने पाकिस्तानात संतापाची लाट! पीसीबीची रेफरीबद्दल आयसीसीकडे तक्रार
कर्णधार रजत पाटीदारची प्रतिक्रिया –
That winning feeling 🤗
Central Zone Captain Rajat Patidar receives the coveted Duleep Trophy 🏆 from Mr. VVS Laxman, Head of Cricket, BCCI Centre of Excellence (COE) 👏 👏#DuleepTrophy | #Final | @rrjjt_01 | @VVSLaxman281 | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️… pic.twitter.com/r4cNT3wf6F
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 15, 2025
विजयानंतर कर्णधार रजत पाटीदारने आनंद व्यक्त करताना सांगितले, “प्रत्येक कर्णधाराला ट्रॉफी जिंकायला आवडते. आमच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी केवळ अंतिम सामन्यातच नव्हे, तर मागील दोन सामन्यांतही उत्कृष्ट कामगिरी केली. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती, पण आमच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखले. खेळपट्टी काहीशी कोरडी होती, त्यामुळे आम्ही प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आमचे उद्दिष्ट पहिल्या डावात त्यांना लवकर बाद करणे होते. आम्हाला वाटले की वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल, पण फिरकी गोलंदाजांना जास्त फायदा झाला.”
हेही वाचा – IND vs PAK : हस्तांदोलन न करणे टीम इंडियाला महागात पडणार? ICC चा नियम काय सांगतो? जाणून घ्या
सेंट्रल झोनच्या या विजयाने रजत पाटीदारच्या नेतृत्वगुणांचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे. यापूर्वी त्याने आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) पहिल्यांदा विजेतेपद मिळवून देऊन 18 वर्षांचा किताबी दुष्काळ संपवला होता. आता दलीप ट्रॉफीच्या विजेतेपदासह त्याने आणखी एक मोठा पराक्रम गाजवला आहे.





