Central Zone Squad : दुलीप ट्रॉफी २०२६ साठी सेंट्रल झोन संघाची घोषणा! रजत पाटीदार अन् रिंकू सिंहला मिळाली मोठी जबाबदारी
Central Zone Squad : दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेसाठी गतविजेत्या सेंट्रल झोन संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Duleep Trophy 2026 Central Zone Squad Announce Rajat Patidar Captain : घरगुती क्रिकेटमधील प्रतिष्ठित ‘दुलीप ट्रॉफी २०२६’ (Duleep Trophy 2026) स्पर्धेसाठी गतविजेत्या सेंट्रल झोन (Central Zone) संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. संघाच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा स्टार फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar) याच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर भारताचा युवा अन् आक्रमक फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) याच्यावर उपकर्णधारपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या हंगामात साउथ झोनचा पराभव करत विजेतेपद पटकावणाऱ्या सेंट्रल झोनचे लक्ष यंदाही ट्रॉफी राखण्यावर असेल.
हर्ष दुबे आणि यश ठाकूरला संघात स्थान!
सेंट्रल झोनच्या १५ सदस्यीय ताफ्यात आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या खेळाडूंचा भरणा आहे. यामध्ये अष्टपैलू हर्ष दुबे आणि वेगवान गोलंदाज यश ठाकूर यांचा समावेश आहे. फिरकीची धुरा सारांश जैन सांभाळेल, ज्याला उत्तर प्रदेशचा लेग स्पिनर जीशान अंसारी आणि हर्ष दुबे साथ देतील.
रणजीतील कामगिरीचे अमन मोखाडेला बक्षीस!
Defending Champions Central Zone Announce Squad for the 2026–27 Duleep Trophy.
Rajat Patidar (C), Rinku Singh (VC), Aryan Juyal (wicketkeeper), Saransh Jain, Aman Mokhade, Kunal Chandela, Zeeshan Ansari, Aryan Pandey, Arshad Khan, Ayush Pandey, Yash Rathod, Harsh Dubey, Kunal… pic.twitter.com/YU8zCLejYQ
— OneCricket (@OneCricketApp) August 1, 2026
विदर्भच्या अमन मोखाडेने २०२५-२६ च्या रणजी हंगामात ११ डावांमध्ये ७६ च्या सरासरीने ७६० धावा कुटल्या होत्या, ज्याचे बक्षीस म्हणून त्याला संघात स्थान मिळाले आहे. त्याच्यासोबत छत्तीसगडचा सलामीवीर आयुष पांडे आणि मधल्या फळीत यश राठोड हे पाटीदार आणि रिंकू सिंहसोबत फलंदाजीचा भार सांभाळतील.
३० ऑगस्टला खेळणार सेमीफायनल!
गतविजेते असल्याने सेंट्रल झोनला थेट उपांत्य फेरीत (Semi-Final) प्रवेश मिळाला आहे. त्यांचा सेमीफायनल सामना ३० ऑगस्ट रोजी ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोनमधील विजेत्या संघाविरुद्ध होईल. ही स्पर्धा २३ ऑगस्टपासून बंगळुरू येथील ‘CoE’ मैदानावर सुरू होत असून अंतिम सामना ६ सप्टेंबरपासून खेळवला जाईल.
सेंट्रल झोनचा संपूर्ण संघ: रजत पाटीदार (कर्णधार), रिंकू सिंह (उपकर्णधार), आर्यन जुयाल (विकेटकीपर), सारांश जैन, अमन मोखाडे, कुणाल चंदेला, जीशान अंसारी, आर्यन पांडे, अरशद खान, आयुष पांडे, यश राठोड, हर्ष दुबे, कुणाल सिंह राठोड (विकेटकीपर), यश ठाकूर, नचिकेत भुटे.





