देशात लवकरच जनगणना केली जाणार
Updated On:

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडून देशात लवकरच जनगणना केली जाण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून ही जनगणना प्रलंबित असून त्याबाबत विविध मंचांवरून प्रश्न उपस्थित केले जात असताना सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेने लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवणारी बातमी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जनगणनेच्या संदर्भातील नवीन सर्वेक्षण जर पुढच्य महिन्यात सुरू झाले तर ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान १८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालय आणि सांख्यिकी विभागाने यासंदर्भातील जुळवाजुळव सुरू केली असून २०२६ पर्यंत जनगणना पूर्ण केली जाण्याचे लक्ष्य त्यांनी निर्धारित केले आहे व त्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले आहे.
टॅग्स:





