राज्यघटना दुरूस्त करून ओबीसींची जनगणना करावी; चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी
Updated On:

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटना दुरूस्ती करावी आणि एससी, एसटींची जशी जनगणना होते, त्या पद्धतीने ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
1950पासून कोणत्याही सरकारने ओबीसींची जगनणना केलेली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने राज्यघटनेत दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील गादा या गावात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, ओबीसी समाजाने आता एकजुटीने राजकीय आरक्षणाची मागणी केली पाहिजे. राजकीय भूमिका बाजूला ठेऊन आपण सर्वांनी एकत्रितरीत्या केंद्र सरकारकडे ही मागणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.




