वाढत्या वयावरून ट्रोल करणाऱ्यांना सेलिना जेटलीने दिले सडेतोड उत्तर

Celina Jaitley | बॉलीवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मात्र गेल्या बऱ्याच काळापासून ती सिनेइंडस्ट्रीपासून दुर आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत वयावरून टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
सेलिनाना पोस्ट शेअर स्त्रीचे वय कितीही असले तरी ती कधीही स्वतःला नव्या रूपात सादर करू शकते आणि आपल्या करिअर किंवा आयुष्यात नवीन सुरुवात करू शकते, असे सांगत एक संदेश दिला आहे.
सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, ‘नो फिल्टर, त्यांनी मला अलीकडेच सांगितले होते की, ३९ वर्षांच्या वयानंतर या इंडस्ट्रीत महिलांचा वावर कमी होऊ लागतात. तुम्ही २७ वर्षांचे दिसता, पण खरी गोष्ट म्हणजे वयाचा आकडा. मी प्रतिक्रिया दिली, मग त्या आकड्यांकडे काळजीपूर्वक पहा, कारण ते खूप दमदार ठरतील. माझ्या काही इंस्टाग्राम रील्सना ३० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, जे काही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कामगिरीपेक्षा चांगले आहे. वयामुळे तुम्हाला कधीही बाजूला केले जाऊ शकत नाही.’ Celina Jaitley |
View this post on Instagram
पुढे सेलिनाने मातृत्वाबद्दलही सांगितले की, ‘आई झाल्यामुळे ती थांबली नाही, उलट पुढे जाण्याची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची शक्ती दिली. प्रत्येक आव्हानाने तिला आणखी मजबूत बनवले आहे. आई होण्याने माझा प्रवास थांबला नाही, तर तो अधिक सोनेरी झाला आहे. प्रत्येक अडचणीने आणि प्रत्येक वेळी स्वतःला नव्याने सादर करण्याच्या प्रक्रियेमुळे मी अधिक मजबूत झाले आहे. माझा प्रवास अजून खूप पुढे आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. मी पूर्वीपेक्षा जास्त धाडसी झाले आहे. मी माझा मार्ग स्वतः बनवेन. वयाच्या आधारावर कोणालाही, विशेषतः स्त्रियांना, पारखणे चुकीचे आहे. त्यांनी पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही आवाहन केले की, वय वाढल्यानंतर योगदान किंवा ओळख संपते ही विचारसरणी सोडून द्यावी.’ याद्वारे तिने वयाच्या आधारे कोणाचाही न्याय करणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. Celina Jaitley |
दरम्यान, सेलिना तीन मुलांची आई आहे. तिने 2011 मध्ये व्यावसायिक पीटर हग याच्याशी लग्न केले. एका वर्षानंतर त्यांनी विराज आणि विन्स्टन नावाच्या जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी पुन्हा जुळ्या मुलांना जन्म दिला, पण त्यापैकी फक्त एकच मूल जिवंत राहिले. सध्या ती तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
हेही वाचा :





