Satara News : पालकमंत्री निवडीनंतर महाबळेश्वरमध्ये आनंदोत्सव
Updated On:

महाबळेश्वर : जिल्ह्यातील चार लोकप्रतिनिधींना पालकमंत्रिपदाची संधी मिळाल्याने महायुतीतर्फे महाबळेश्श्वरमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई यांची सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाली.
याचबरोबर वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे आमदार तसेच मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांची बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची लातूरच्या तर जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याचै पालकमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल महायुतीचे पदाधिकारी, नेते तसेच कार्यकर्त्यांमधून फटाक्याच्या आतबाजीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.





