पिंपरी | पालिकेच्या वतीने क्रांती दिन साजरा

पिंपरी, (प्रतिनिधी) – “इन्कलाब जिंदाबाद”,”भारत माता की जय”,”वंदे मातरम” अशा घोषणांनी भारतमातेचा जयजयकार करत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांती दिन साजरा करण्यात आला.
क्रांतीदिनानिमित्त चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास, चिंचवड स्टेशन येथे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
माजी नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, सुरेश भोईर, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते गतीराम भोईर, विजय गावडे आदी उपस्थित होते.
चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी कार्यकारी अभियंता नितीन देशमुख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष अण्णा कसबे, उपअभियंता विजय कांबळे आदी उपस्थित होते.
तसेच, दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसदस्य रोहीत काटे, माजी नगरसदस्या स्वाती काटे, शहीद नारायण दाभाडे यांचे नातू धनंजय दाभाडे आदी उपस्थित होते.





