Shirur : रामलिंग येथे वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

शिरूर : रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने वटपौर्णिमा ,रामलिंग येथे दरवर्षी प्रमाणे वडाचे झाड लावून साजरी करण्यात आली. वटपौर्णिमा हा सण सर्व ठिकाणी आनंदात स्त्रिया साजरा करतात. वडाची झाडाची पुजा करून पतीचा दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
वडाचे झाड केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीनेच नाही, तर वैज्ञानिक दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. त्याचे औषधी गुणधर्म आणि पर्यावरणातील महत्व यामुळे ते एक अद्वितीय वृक्ष मानले जाते. आज आपल्याला जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन या झाडापासून मिळतो .कोरोना मध्ये याचे महत्व सर्वांना समजलेच आहे.
म्हणूनच पुढचा पिढीसाठी प्राणवायू मिळण्यासाठी प्रत्येक स्त्री ने वटपौर्णिमा या दिवशी वडाचे एक झाड लावून ते वाढवले पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने ती वटपौर्णिमा साजरी होईल. आज रामलिंग येथे महिलांनी वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केली.यावेळी ग्रा. सदस्य लीला दौंडकर , ग्रा. सदस्य लता इसवे, ग्रा. सदस्य – यशोधा दसगुडे, तांबे मॅडम, डॉ. स्मिता कवाद, गीता आढाव, छाया अल्हाड, अर्चना कर्डिले, माया रेपाळे, छाया जगदाळे, राधा रेपाळे, कविता करंजुले, रुपाली बोर्डे, अँटी लोंढे अनेक महिला उपस्थित होत्या. सर्वांचे आभार रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.





