कष्टकरी महिलांच्या हस्ते केक कापून प्रतिभा पवार यांचा वाढदिवस साजरा

मांजरी – माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा १२ डिसेंबर वाढदिवस आणि त्यांना गेली पाच दशकाहून अधिक काळ तितकीच मोलाची साथ देणाऱ्या प्रतिभा पवार यांचा १३ डिसेंबर वाढदिवस हा दुग्धशर्करा योग आहे. असे मत माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस विक्रम शेवाळे यांनी कष्टकरी महिलांच्या हस्ते केक कापून प्रतिभा शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा भारती शेवाळे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान विक्रम शेवाळे यांच्यावतीने घरकाम करणाऱ्या महिला, आशा वर्कर, स्वच्छ संस्था महिला कर्मचारी व शेवाळेवाडी ग्रामपंचायत महिला कामगार यांना विधान परिषदेचे माजी आमदार जगन्नाथबाप्पू शेवाळे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.





