मुंबई :-महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने राज्य कबड्डी दिन नुकताच साजरा करण्यात आला. कबड्डीमहर्षी शंकरराव तथा बुवा साळवी यांच्या प्रतिमेला हार परिधान करत संघटनेने अत्यंत साधेपणाने व निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत हा दिन तेथील शिवाजी महाराज मैदानातील संघटनेच्या कार्यालयात साजरा केला. करोनाचा धोका राज्यात कायम असल्याने या कार्यक्रमाला कोणताही बडेजाव ठेवण्यात आला नव्हता.
ज्येष्ठ खेळाडू तारक राऊळ, श्रीराम (राजू) भावसार, उदयोन्मुख खेळाडू पंकज मोहिते यांच्या हस्ते बुवांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी कबड्डी संघटक मीनानाथ धानजी, रवींद्र करमरकर, राजेश पाडावे, रमेश हरयाणा, मालोजी भोसले, शशिकांत राऊत, सदानंद माजलकर, अनिल नागवेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सदस्य प्रवीण सावंत यांनी पुढाकार घेतला होता. प्रास्ताविक मीनानाथ धानजी यांनी तर, आभारप्रदर्शन शशी राऊत यांनी केले.