पुणे जिल्हा | शासकीय कार्यालयात अवतारदिन साजरा करा

उरुळी कांचन, (वार्ताहर)- सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन’ 5 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, संस्थेत साजरा करण्यात यावा. अशी मागणीचे निवेदन अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने शिक्रापूर येथील अखिल भारतीय महानुभाव परिषद मुख्य सचिव महंत कृष्णराजबाबा शास्त्री पंजाबी, पुणे काळेचीवाडी येथील जिल्हा महानुभाव परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष महंत रामचंद्र बाबा गुर्जर यांनी हे निवेदन दिले.
यावेळी पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे कृष्णराज शास्त्री तळेगावकर, साळवाडी. म. मुळावकर बाबा वढू, राजुदादा भोजने, चांडोली, श्रीसुरेंद्रमुनी आराध्य, मळद, योगेशदादा महानुभाव, पारगाव, हरिपाळ दादा तळेगावकर, साळवाडी, महेंद्रदादा पंजाबी, शिक्रापूरसह जिल्ह्यातील संत महंत उपस्थित होते.
दरम्यान, यावर्षीच्या अवतारदिन सोहळ्याचे आयोजक श्रीकृष्ण मंदिर तथा श्रीकृष्ण अध्यात्मिक प्रतिष्ठान कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील पदाधिकारी श्रीकृष्ण आध्यात्मिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठल कोलते, कोरेगावमुळ विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन संजय भोसले, हवेली तालुका महानुभाव परिषद अध्यक्ष राजेंद्र खेडेकर उपस्थित होते.




