भारताविरुद्ध मोठे षडयंत्र ! पाकिस्तानची ‘या’ देशासोबतची जवळीक धोक्याची घंटा?; सीडीएस अनिल चौहान यांचे विधान

CDS Anil Chauhan। पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून भारताविरुद्ध कट रचत आहे आणि त्यात चीनचीही भूमिका महत्वाची आहे. पाकिस्तान आणि चीन एकमेकांना भेटणे भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. लष्करप्रमुख सीडीएस अनिल चौहान यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी,”गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानला चीनकडून ७० ते ८० टक्के शस्त्रे आणि उपकरणे मिळाली आहेत” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सीडीएस चौहान यांनी बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावरही प्रतिक्रिया दिली. एका इंग्रजी वर्तमानपत्रातील वृत्तानुसार,”हिंद महासागर क्षेत्रातील देशांचे आर्थिक संकट त्यांच्यासाठी समस्या बनू शकते. यामुळे बाह्य शक्तींना त्यांचा प्रभाव वाढवण्याची संधी मिळाली आहे. त्याचा भारतावरही परिणाम होऊ शकतो.” असे त्यांनी सांगितले आहे.
चीन-पाकिस्तान आणि बांगलादेश संबंधांवर प्रतिक्रिया CDS Anil Chauhan।
सीडीएस चौहान यांनी, “दक्षिण आशियातील सरकारे वारंवार बदलत असल्याने, भू-राजकीय समीकरणे आणि वैचारिक दृष्टिकोन देखील बदलत आहेत, जे आणखी एक महत्त्वाचे आव्हान आहे. त्याचप्रमाणे, वैयक्तिक फायद्यांमुळे चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश जवळ येत आहेत, जे भारताच्या सुरक्षिततेसाठी आणि स्थिरतेसाठी धोका निर्माण करू शकतात.” असे म्हटले. जागतिक सुरक्षेबद्दल सीडीएस चौहान म्हणाले की,”सध्याच्या परिस्थितीची आपल्याला सर्वांना जाणीव आहे. ते म्हणाले की अमेरिकेमुळे जागतिक सुरक्षेबाबत अडचणी वाढल्या आहेत.”
ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीन-पाकिस्तान मैत्री CDS Anil Chauhan।
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या दरम्यान, भारतीय सैन्याने शंभराहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावर उप-लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी सांगितले की पाकिस्तानला चीनकडून मदत मिळाली आहे. पाकिस्तानची ७० ते ८० टक्के शस्त्रे चीनने दिली आहेत.





