पुणे जिल्हा | हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे सीबीएससी बोर्ड परीक्षेत यश

पिरंगुट, (वार्ताहर) – कासारआंबोली (ता. मुळशी) येथील ज्ञानदीप शिक्षण संस्था संचलित हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएससी बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवले आहे. शाळेचा निकाल ९७ टक्के लागला आहे.
सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये शाळेतील खुशी पाटील ९४.६ टक्के , हेमंत हेब्बालकर ९४.४ टक्के, सुयश आल्हाट ८७.४ टक्के, सुयश सुकाळे ८५.८ टक्के, आदित्य मिश्रा ८४.२ टक्के, अंतरा सुतार ८२.८ टक्के, आर्यन खिलारे ८१ टक्केव, आदित्य कडाळे ७८.८ टक्के आणि प्रज्योत मोरे ७८.४ टक्के यांनी गुणानुक्रमे १० क्रमांक पटकावले.
विद्यार्थी केंद्रीय शिक्षण पद्धती, अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम व आधुनिक शिक्षण पद्धती यामुळे शाळेने यापूर्वी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ यासाठी तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
तसेच ‘राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ मिळवला आहे. दहावी बोर्डमध्येही विद्यार्थ्यांनी विविध विषयात ९० पेक्षाही जास्त गुण मिळवले आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालक व व्यवस्थापन या सर्वांच्या एकजुटीने हे यश संपादन करणे शक्य झाले आहे,असे प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सर्वोत्तम यशाबद्दल संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष कृष्णा भिलारे, सचिव संगीता भिलारे, संचालक कुणाल भिलारे, कार्यकारी प्रशासकीय व्यवस्थापिका यशस्विनी भिलारे व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे कौतुक केले आणि भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





