झारखंडमधील बेकायदेशीर खाणींचा तपास सीबीआयद्वारे व्हावा ; भाजपची मागणी
Updated On:

धनाबाद – झारखंडमधील बेकायदेशीर खाणींच्या व्यवहारांचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणी झारखंड भाजपने केली आहे. भारत कोकिंक कोल लिमिटेड या खाणीच्या परिसरातील एक रस्ता अचानक खचल्यामुळे भाजपने या खाणींच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. झारखंडमध्ये अशा प्रकारच्या घटना अलिकडच्या काळात अचानक व्हायला लागल्या आहेत.
त्यामुळे बेकायदेशीर खाणींची चौकशी व्हायला पाहिजे असे झारखंड बाजपचे प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांनी सांगितले.
बेकायदेशीर खाण उद्योग हेमंत सोरेन यांच्याकाळापासूनच सुरू आहे. या बेकायदेशीर खाणींमुळे राज्याचे आर्थिक नुकसान तर झाले आहेच. त्याशिवाय अनेकांचे जीवदेखील गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयकरवी चौकशी व्हायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
टॅग्स:





