Nagar | जातीवाचक शिवीगाळ ; तिघांविरूध्द विनभंगासह अॅट्राॅसिटीचा गुन्हा

नगर, (प्रतिनिधी) – शहरातील मुख्यबाजारपेठेतील मोची गल्लीत दुचाकी पार्किंग करण्याच्या कारणातून तिघांनी महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांना लज्जा उत्पन्न होइल असे वर्तन केल्याची घटना गुरुवार (दि.५) रोजी दुपारी घडली. याबाबत तिघांविरूद्ध कोतवाली पोलीस् ठाण्यात विनयभंगासह अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकूर अजीज शेख, अजीज शकूर शेख, अकलाफ मन्सूर शेख (सर्व. रा. शनी गल्ली, झेंडीगेट), असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत पिडीत महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिलेने तिच्या दुकानासमोर दुचाकी लावली असता संशयीत आरोपींनी तिला शिवीगाळ करत चापटीने मारहाण करत विनयभंग केला. फिर्यादीची आई वाचविण्यासाठी आली असता तिला देखील मारहाण केली. याबाबत महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





