इटालियन ओपन स्पर्धेत कॅरोलिनाला महिला गटाचे जेतेपद

रोम : चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने जोरदार कामगिरी करत इटालियन ओपन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जोहाना कोंताला नमवित जेतेपद मिळवले. तिने अंतिम सामन्यामध्ये सरळ सेटमध्ये जोहानाला 6-3, 6-4 असे पराभूत करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

त्यापूर्वी महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने ग्रीसच्या मारिया साकारीला 6-4, 6-4 असे नमविले. तर, ब्रिटनच्या योहानाने माद्रिद ओपन विजेता किकी बर्टन्सला 5-7, 7-5, 6-2 असे पराभूत करत अंतिम फेरीत आगेकूच केली होती.

दरम्यान, ‘क्‍ले कोर्टचा’ बादशाह राफेल नदालने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद आपल्याकडे राखले. अंतिम लढतीत नदालने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा संघर्षपूर्ण पराभव करत 34वे मास्टर्सचे विजेतेपद पटकावले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×